Tuesday, June 2, 2015

साता जन्माची डेअरींग



आठवणीतील
वात्रटिका
-----------------------------

साता जन्माची डेअरी

ज्येष्ठ पौर्णिमेला वडाचा 
भलताच 'वट' असतो. 
पुढच्या साताजन्मासाठी नवरा 
म्हणे मागितला की घट असतो.

पुढच्या सात जन्माची 
ही ॲडव्हांस बुकींग असते.
नीट विचार केला तर 
सगळेच शॉकींग असते.

श्रद्धा किती? अंधश्रद्धा किती? 
हे डोळसपणे जाणावे लागेल ! 
नसता बायकांना प्रतिगामीच नाही; 
तर डेअरींगबाजही म्हणावे लागेल !!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड) 
मोबा. ९९२३८४७२६९
-----------------------
फेरफटका - ५५३९ 
 दै.झुंजार नेता 
२ जून २०१५

No comments:

daily vatratika...29jane2026