प्रसिध्द वात्रटिकाकार,व्याख्याते,मुक्तपत्रकार
आणि कविवर्य सूर्यकांत डॊळसे यांची
साहित्य संमेलना वर भाष्य करणारी
एक जबरदस्त मालिका वात्रटिका
खास आपल्यासाठी...
साहित्य संमेलना वर भाष्य करणारी
एक जबरदस्त मालिका वात्रटिका
खास आपल्यासाठी...
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते................
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते................
घालमोडे दादांचे
जिथे पेवच्या पेव फुटले जाते.
शब्दप्रभुंच्याही जिभेवरचे
जिथे नियंत्रण सुटले जाते.
जिथे पेवच्या पेव फुटले जाते.
शब्दप्रभुंच्याही जिभेवरचे
जिथे नियंत्रण सुटले जाते.
वादळांचे वादळ तर
पूर्वी आणि नंतरही
अगदी हमखास उठले जाते,
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
पूर्वी आणि नंतरही
अगदी हमखास उठले जाते,
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
हौश्यांचे असते,
नवश्यांचे असते,
गवश्यांचेही असते.
हसव्यांचे असते,
फसव्यांचेही असते,
बाजारबसव्यांचे असते.
वर्षभर ताणून ताणून
जिथे ऐनवेळी फाटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
नवश्यांचे असते,
गवश्यांचेही असते.
हसव्यांचे असते,
फसव्यांचेही असते,
बाजारबसव्यांचे असते.
वर्षभर ताणून ताणून
जिथे ऐनवेळी फाटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
कधी कधी ठोकशाही,
कधी कधी लोकशाही असते.
पारदर्शक निवडीची
अध्यक्षीय ग्वाही असतेq
बारा कोटीच्या मराठीचे
चिमूटभर मतदार असतात.
जाणकारांपेक्षा अजाणतेच
मतदार यादीत फार असतात.
कधी कधी लोकशाही असते.
पारदर्शक निवडीची
अध्यक्षीय ग्वाही असतेq
बारा कोटीच्या मराठीचे
चिमूटभर मतदार असतात.
जाणकारांपेक्षा अजाणतेच
मतदार यादीत फार असतात.
पक्षीय निवड्णूकांत उठत नाही,
तेवढे प्रचाराचे रान
जिथे उठले जाते,
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
तेवढे प्रचाराचे रान
जिथे उठले जाते,
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
निवडणूकीच्या नावाखाली
मराठी छळली जाते.
जी पाळता येईल
ती ती गोष्ट पाळली जाते.
मराठी छळली जाते.
जी पाळता येईल
ती ती गोष्ट पाळली जाते.
कधीतरी उत्तम निवड,
नसता खोगीरभरती असते.
ज्याला वाचकच नसतो
अशांचीच आरती असते.
नसता खोगीरभरती असते.
ज्याला वाचकच नसतो
अशांचीच आरती असते.
कंपूशाहीपुढे वाचकप्रियतेचे
जिथे भान सुटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
जिथे भान सुटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
अस्सल साहित्यिक
या तमाशाकडे पाठ फिरवतात.
एकदा तमाशा रंगला की,
हे सगळ्यांची जिरवतात.
या तमाशाकडे पाठ फिरवतात.
एकदा तमाशा रंगला की,
हे सगळ्यांची जिरवतात.
यांच्याकडे हालकरी असतात,
यांच्याकडे झेलकरी असतात.
पावत्या फाडून ठेवलेले
यांच्याकडे सालकरी असतात.
यांच्याकडे झेलकरी असतात.
पावत्या फाडून ठेवलेले
यांच्याकडे सालकरी असतात.
अश्या सालकर्यांनाच
जिथे पुढे पुढे रेटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
जिथे पुढे पुढे रेटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
आपले खरे हेतू
बरोबर दडवले जातात.
गरज वाटतील तसे
वादही घडवले जात्तात.
बरोबर दडवले जातात.
गरज वाटतील तसे
वादही घडवले जात्तात.
आपला तो बाब्या,
दुसर्यांचा तो कार्टा मानला जातो.
पाहिजे तेंव्हा,पाहिजे तो
निवडून आणला जातो.
दुसर्यांचा तो कार्टा मानला जातो.
पाहिजे तेंव्हा,पाहिजे तो
निवडून आणला जातो.
चुकून डाव फसला की,
जिथे नियंत्रण सुटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
जिथे नियंत्रण सुटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
आयोजक,प्रायोजकांच्या
सगळा खजिना मुठीत असतो.
संमेलनांचा खर्च तर
लाखात आणि कोटीत असतो.
सगळा खजिना मुठीत असतो.
संमेलनांचा खर्च तर
लाखात आणि कोटीत असतो.
दारूवाले,तंबाखूवाले,
सगळे सगळे चालतात.
पैशावाले सांगतील,
तसे तसेच बोलतात.
सगळे सगळे चालतात.
पैशावाले सांगतील,
तसे तसेच बोलतात.
पैशापुढे साहित्याचे
नरडे जिथे घोटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
नरडे जिथे घोटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
आयोजक साधेसुधे नकोत,
यांना राजकारणी लागतात.
मागचे-पुढचे उद्योग
आपोआप कारणी लागतात.
यांना राजकारणी लागतात.
मागचे-पुढचे उद्योग
आपोआप कारणी लागतात.
देणारा मिरवून घेतो,
आपली हौस पुरवून घेतो.
साहित्याचा खरा उपासक
आपल्या हाताने जिरवून घेतो.
आपली हौस पुरवून घेतो.
साहित्याचा खरा उपासक
आपल्या हाताने जिरवून घेतो.
साहित्यिकांच्या आब्रुला
जिथे खादीकडून लुटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
जिथे खादीकडून लुटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
संमेलनांच्या कार्यक्रमांची तर
विचारायचीच सोय नसते.
आपल्या कंपूतला नसला तर
निमंत्रणांसाठी होय नसते.
विचारायचीच सोय नसते.
आपल्या कंपूतला नसला तर
निमंत्रणांसाठी होय नसते.
निमंत्रणाची यादी तर
मागच्या वेळच्याहून पुढे असते.
ज्याला ज्याला दामटता येइल
त्याने त्याने घोडे दामटलेले असते.
मागच्या वेळच्याहून पुढे असते.
ज्याला ज्याला दामटता येइल
त्याने त्याने घोडे दामटलेले असते.
तेच तेच चेहरे बघून
जिथे मनही विटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
जिथे मनही विटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
कविसंमेलनांचे तर
विचारूच नका.
त्याच त्याच कवितांची चंदी आहे
जणू माय मराठीच्या
काव्यप्रतिभेची नसबंदी आहे.
विचारूच नका.
त्याच त्याच कवितांची चंदी आहे
जणू माय मराठीच्या
काव्यप्रतिभेची नसबंदी आहे.
कवितेच्या नावावर
वाट्टेल ते हाणू लागत्तात.
कवि उभा राहण्या अगोदरच
रसिक कविता म्हणू लागतात.
वाट्टेल ते हाणू लागत्तात.
कवि उभा राहण्या अगोदरच
रसिक कविता म्हणू लागतात.
जुन्याच कविता ऐकणे
जिथे लज्जास्पद वाटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
जिथे लज्जास्पद वाटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
परीसंवादांचीसुद्धा
तसलीच तर्हा आहे.
वाटतच नाही,
काढलेला सुर खरा आहे.
तसलीच तर्हा आहे.
वाटतच नाही,
काढलेला सुर खरा आहे.
कधी टिकी-टिकी खेळतात,
कधी टाळ्यांचा सिक्स असतो.
ऐकता ऐकता. कळून चुकते,
परीसंवाद फिक्स असतो.
कधी टाळ्यांचा सिक्स असतो.
ऐकता ऐकता. कळून चुकते,
परीसंवाद फिक्स असतो.
हवे ते सोडून
नको तेच जिथे भेटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
नको तेच जिथे भेटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
कसल्या कसल्या कथा
कथाकथनातून कथल्या जातात.
कथन सोडून वाचनावरच
कथाही बेतल्या जातात.
कथाकथनातून कथल्या जातात.
कथन सोडून वाचनावरच
कथाही बेतल्या जातात.
परीसंवादात,कथाकथनात
न बसलेले
कविसंमेलनात घुसविले जातात.
बसविणे सक्ताचे असल्याने
नको तिथे बसविले जात्तात.
न बसलेले
कविसंमेलनात घुसविले जातात.
बसविणे सक्ताचे असल्याने
नको तिथे बसविले जात्तात.
विद्रोहाच्या आवाजानेही
जिथे व्यासपिठ बाटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
जिथे व्यासपिठ बाटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
जुणे ठराव नवे करून,
बहूमताने पास होतात.
उत्सववेड्या लोकांचे
माय मराठीला त्रास होतात.
बहूमताने पास होतात.
उत्सववेड्या लोकांचे
माय मराठीला त्रास होतात.
मराठीवरील अन्यायाचा
पोकळ शब्दांत निषेध असतो.
विश्वसंमेलनाच्या हौसेपोटी
मराठी मनाचा शोध असतो.
पोकळ शब्दांत निषेध असतो.
विश्वसंमेलनाच्या हौसेपोटी
मराठी मनाचा शोध असतो.
संमेलनाचे सूप वाजवून
नव्या प्रतिभेला
मांडवाबाहेर
जिथे बरोबर छाटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
नव्या प्रतिभेला
मांडवाबाहेर
जिथे बरोबर छाटले जाते.
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते.
नट-नट्यांच्या दर्शनाने
रसिक बिचारे हरखुन जातात.
वर्षभराची ग्रंथखरेदी
रसिक बिचारे उरकून जातात.
रसिक बिचारे हरखुन जातात.
वर्षभराची ग्रंथखरेदी
रसिक बिचारे उरकून जातात.
मंडपाखालची मोकळी जागा
करूण कहाणी सांगत राहते
वैचारीकतेपेक्षा
भोजनावळींचीच चर्चा
दिवसेंदिवस रंगत राहते.
करूण कहाणी सांगत राहते
वैचारीकतेपेक्षा
भोजनावळींचीच चर्चा
दिवसेंदिवस रंगत राहते.
पदरात काही नाही पडले तरी
मराठी रसिकाला
जिथे समाधान भेटले जाते !
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते !!
मराठी रसिकाला
जिथे समाधान भेटले जाते !
त्यालाच तर
मराठी साहित्य संमेलन म्हटले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-९९ २३ ८४७ २६९
मोबाईल-९९ २३ ८४७ २६९
पूर्वप्रसिद्धी-
दैनिक पुण्यनगरी
25 डिसेंबर 2010
दैनिक पुण्यनगरी
25 डिसेंबर 2010
No comments:
Post a Comment