आजची वात्रटिका
----------------------
भीमस्पर्श
ज्यास लाभला भीमस्पर्श
त्या मातीचे सोने झाले.
कालच्या त्या चिल्लरीचे
खणखणीत नाणे झाले.
ज्यास लाभला भीमस्पर्श
त्या शेळीचे वाघ झाले.
बिलबिलीत त्या गांडुळांचे
फुसफुसणारे नाग झाले.
ज्यास लाभला भीमस्पर्श
ते मेंदूही लखलखीत झाले.
वर्षानुवर्षे दु:स्वास केला
ते मेंदूही चक-चकीत झाले.
ज्यास लाभला भीमस्पर्श,
पण स्वार्थ सोडला नाही!
त्यास सांगणे इतकेच की,
हा 'भीमरथ' काही अडला नाही!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
चिमटा-4701
दैनिक पुण्यनगरी
14एप्रिल 2017
No comments:
Post a Comment