Sunday, March 1, 2026

चोरांची शिरजोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
चोरांची शिरजोरी
सज्जनांना इथे विचारतो कोण?
इथे चोरांचाच गाजावाजा आहे.
सज्जनांच्या पदरी उपेक्षा,
इथे चोरांचीच मौज मजा आहे.
सज्जनतेला भजतो कोण?
इथे चोरांचीच पूजा अर्चा आहे.
सज्जनांच्या चांगुलपणाची सोडून,
चोरांच्याच कर्तृत्वाची चर्चा आहे.
चोरच चोरावरती मोर आहेत,
चोरच चोरावरती शिरजोर आहेत !
उद्याच्या भविष्याचे मात्र,
सज्जनांना भयंकर घोर आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9204
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 मार्च 2026

 

चोरांची शिरजोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- चोरांची शिरजोरी सज्जनांना इथे विचारतो कोण? इथे चोरांचाच गाजावाजा आहे. सज्जनांच्या पदरी उपेक्षा, ...