Tuesday, November 29, 2011

भांडवली धोरण

भांडवली धोरण

भांडवलासाठी मुद्दा पाहिजे
शेतकर्‍यांचे कुणाला पडले आहे?
शेतकर्‍यांसाठी लढावे म्हणून
कुठे कुणाचे घोडे अडले आहे?

ते स्वत:साठी लढत आहेत,
शेतकर्‍यांसाठी लढत नाहीत!
सत्तेवर कुणीही असोत
शेतकर्‍यांना पिळायचे सोडत नाहीत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

daily vatratika...29jane2026