Sunday, November 18, 2012
अखेरचा जय महाराष्ट्र
हृदयाच्या सम्राटाला
सैनिकांनी हृदयात फ्रेम केले होते.
राजकीय मित्रांनीच काय?
राजकीय शत्रूंनीही प्रेम केले होते.
ओठात एक,पोटात एक
याचा त्यांना तिटकारा होता.
ठाकरी शैलीच्या आसूडासोबत
कुंचल्याचा फटकारा होता.
त्यांच्या अखेरच्या जय महाराष्ट्रने
हृदया-हृदयाला चरका आहे !
अमोघ वाणी आणिे कर्तृत्त्वाला
हा महाराष्ट्र पोरका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Subscribe to:
Post Comments (Atom)
नवी लोकशाही.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- नवी लोकशाही प्रत्येक वेळी बहुमताचा आदर, ठेवला जातोच असे नाही. यासारखे दुसरे कोणतेच, लोकां...
-
आजची वात्रटिका ----------------------- *राजकीय ऑफर्स* जशी इकडूनही ऑफर आहे, तशी तिकडूनही ऑफर आहे. आपण फक्त तुलना करायची, कोण ज...
No comments:
Post a Comment