Saturday, June 20, 2009

अंदाज पावसाचा

पाऊसनामा

पाऊस म्हणजे लॉटरी,
पाऊस म्हणजे सट्टा असतो.
नको तेंव्हा नको तिकडे
कमी दाबाचा पट्टा असतो.

अस्तिक आणि नास्तिकांचीही
पाऊस बरोबर जिरवतो.
दुष्काळी ढग घेऊन
पाऊस उरावर मिरवतो.

पुढून झाकावे तर
मागून उघडे करतो !
शासन आणि प्रशासनही
पाऊस नागडे करतो !!
********************************
आपत्ती व्यवस्थापन

तो मुसळ्धार होताच
ती गड्बडून जाते.
तीचे आपत्ती व्यवस्थापन
मग कोलमडून जाते.

ती हतबल होत
अखेर त्याला शरण जाते !
तीच्या आपत्ती व्यवस्थापनाचे
त्याच्यापुढे मरण येते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

2 comments:

Unknown said...

ekdum khuskhushit kavita..!!!

Anonymous said...

masta aahe!!

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...