Sunday, June 21, 2009

आमच्या नजरेतला पाऊस

आमच्या नजरेतला पाऊस

पाऊस पुरता राजकारणी
लहरी त्याचे येणे असते.
पाऊस दाटतो डोळ्यात
माती काळ्या बाजाराचे बेणे असते.

पाऊस कृत्रिम तो कृत्रिम
खाल्ल्या मिठाला जागत नाही.
पाऊस तसा भ्रष्टाचारीच
फक्त नडून-आडून मागत नाही.

पाऊस सरकारसारखा हायब्रीड
त्याच्या कोसळण्याचा नेम नाही.
पाऊस जलात्कारी,
पाऊस बलात्कारी.
त्याच्या कोसळण्यात प्रेम नाही.

पाऊस बेईमान असला तरी,
त्याला बेईमान म्हणवत नाही !
तसे त्याचे उपकारच,
खताची टंचाई तरी जाणवत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका 28मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -295वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/15u8GSzlXl_6PRBBezPfwWF...