Friday, July 2, 2010

झाडा-झडती

***** आजची वात्रटिका *****
***************************

झाडा-झडती

झाडे लावा,झाडे जगवा
शासनाचा दट्टा असतो.
थुका लावा,अनुदान लाटा
लोकांचाही रट्टा असतो.

लाटा-लाटीत,वाटा-वाटीत
खाली फक्त गड्डा असतो !
पुन्हा नवी घोषणा होताच
पुन्हा तोच खड्डा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

केदार said...

आज ऑफिसला येताना म्युनिसिपालिटीची लोक एक झाड तोडत होते, चौकशी केल्यावर कळल ते रस्त्याच्या मधे येते आहे. खूप वाईट वाटल. तुमच्या कवितेने ती आठवण परत जागृत केली.

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...