Wednesday, July 21, 2010

चंद्रा-ग्रहण

संयमाचा बांध फुटला,
होऊ नये ते होऊ लागले.
बाभळीच्या पाण्यामध्ये
महाराष्ट्राला पाहू लागले.

आंध्राच्या चंद्राची प्रतिमा
बाभळीने डागाळली आहे!
हायटेक असणारी प्रतिमा
बाभळीने भेगाळली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गर्दीचा शोध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- गर्दीचा शोध पक्ष फुटले;नेते फुटले, प्रचार सभांना गर्दी आहे. जरूर आपला मतदार राजा, खरोखरच दर्दी आहे...