Monday, November 26, 2012

खरेदी-विक्री

मतदान खरेदीची पद्धत
कावेबाज आणि कपटी असते.
राजकीय नशा चढत जाते
सोबतीला बोटी आणि चपटी असते.

कधी चिकन,कधी काजू करी,
वरून लालेलाल तर्री असते !
जे खाण्या-पिण्यावर विकत्ले जातात
त्यांच्यापेक्षा वेश्या तरी बरी असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Panchtarankit said...

जबरदस्त
काका तुमच्या नावाचा उल्लेख करून तुमच्या काही वात्रटिका मला माझ्या पोस्ट
मध्ये वापरायच्या आहेत:
चालेल का
माझे लिखाण जो परिणाम साधू शकत नाही तो तुमची वात्रटिका साधू शकते:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...