Monday, June 29, 2009
अरे चोरांनो.......
अरे चोरांनो.......
चोरली कुणाची कविता तर
निदान चोरी खपली पाहिजे.
कविता चोरावी अशी की,
ती आपल्याला झेपली पाहिजे.
चोरी ती चोरीच
कधी ना कधी फुटली जाते.
उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट
वाचकांनाही पटली जाते.
इतर चोर्यांप्रमाणेच
कवितेचीही चोरी पचत नाही !
कारण काळीज हालल्याशिवाय
कविता कधी सुचत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
2 comments:
वा खुप छान
चोरी तर चोरीच असते मग ती कशीही केली असो. आज काल दोन बोटांनीही चोरी होऊ शकते हे मान्य करायला काहीच हरकत नाही. प्रश्न राईट क्लिकचा नाही किंवा कॉपी पेस्टचा नाही प्रश्न कवीच्या भावनेचा आहे.
it' reality sir
mast ahet sarvach
Post a Comment