Wednesday, June 16, 2010

धनाजीराव

***** आजची वात्रटिका *****
*******************************

धनाजीराव

ज्यांनी करावे त्यांनीच केले
त्यात काय फारसे आहे?
काकांकडून पुतण्याच्या
नव्या नावाचे बारसे आहे.

शत्रुलाही धन्य वाटावे
त्यांची शैलीच तेवढी खास आहे !
धनाजीरावांच्या बाबतीत मात्र
मोठ्या तोंडी लहान घास आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Aruna Kapoor said...

अहो!..हा पण एक नवीन पदार्थ आहे!... ह्याची चव पण लौकरच कळेल!... वात्रटिका छान आहे!

दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 308 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 308 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1X587Lgf5...