Sunday, February 7, 2010

विकासाची तक्रार

***** आजची वात्रटिका *****
**********************

विकासाची तक्रार

विकास म्हणाला योजनेला,
तुझे कसे झकास आहे.
तुझी वाढ होत राहिली
मी मात्र भकास आहे.

तुझा माझा अनैतिक संबंध
आजकाल सर्वज्ञात आहे !
तुझी बाळंतपणं होतात,
माझा मात्र गर्भपात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

सहजीवन....आजची वात्रटिका ,दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ---------------------------- सहजीवन बाबा बुवा आणि राजकारण्यांचा, एकमेकांसाठी दुवा असतो. म्हणूनच नेत्यांच्या आजूबाजूला, कुठला ...