Tuesday, February 2, 2010

रोख ’ठोक’ उपाय

***** आजची वात्रटिका *****
*********************

रोख ’ठोक’ उपाय

देणारा देत आहे
घेणारा घेत आहे.
भ्रष्टाचाराच्या पायावर
सच्चाईचे प्रेत आहे.

घेणारांना घेऊ द्या,
देणारांनी रोकले पाहिजे !
घेण्यासाठी सोकलेल्यांना
मागताक्षणी ठोकले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

वर्णी आणि करणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- वर्णी आणि करणी लोकशाहीच्या मुळावरती, लोकशाहीचीच करणी आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेवर, बघा कुणा कु...