Friday, June 3, 2011

उपोषण

बायको स्वयंपाक करेना,
रागावणार नाही तो नवरा कसला?
उपोषणाच्या बातम्या ऐकून
नवराही उपोपोषणाला बसला.

तसाही उपवास घडला असता,
असाही उपवास घडला गेला !
उपासमारीचा प्रसंग
उपोषणाच्या नावे पडला गेला !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 180 वा

दैनिक वात्रटिका l 29नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 180 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1CzhT6n7p0evsb5NqW...