जे पास झाले होते
ते मेरिटला उतरले नाहीत.
फार कमी सैनिक आहेत
जे सेनापतीवर बिथरले नाहीत
बिथरलेला सूर मग
असा काही गुंजला गेला.
त्याचा प्रतिध्वनी तर
थेट कृष्णकुंजला गेला.
राजकीय आशा मावळताच
सैनिकही नाराज झाले!
जे सगळीकडे होते
तेच त्यांच्याकडेही आज झाले!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, January 31, 2012
Monday, January 30, 2012
जाहीर खुलासा
बातमीची चौकट मोठी येते,
खुलाशाची चौकट बारकी असते.
वस्तूची असो वा चाररित्र्याची
तोडफोड तर सारखी असते.
दुसर्याचा तो स्वैराचार
आपली ती अभिव्यक्ती असते!
बेजबाबदारपणा झटकण्यासाठी
जाहीर खुलाशाची युक्ती असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
खुलाशाची चौकट बारकी असते.
वस्तूची असो वा चाररित्र्याची
तोडफोड तर सारखी असते.
दुसर्याचा तो स्वैराचार
आपली ती अभिव्यक्ती असते!
बेजबाबदारपणा झटकण्यासाठी
जाहीर खुलाशाची युक्ती असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, January 29, 2012
प्रश्नचिन्ह
सर्वात आधी,सर्वात प्रथम
वाट्टेल ते बकू लागतात.
उतावळ्या पत्रकारीतेमुळे
बातम्यांचे ’टाईम्स’चुकू लागतात.
अंदाज आणि बातमी
हे दोन्हीही खूप भिन्न आहे !
तिला बातमी कसे म्हणावे ?
जिच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
वाट्टेल ते बकू लागतात.
उतावळ्या पत्रकारीतेमुळे
बातम्यांचे ’टाईम्स’चुकू लागतात.
अंदाज आणि बातमी
हे दोन्हीही खूप भिन्न आहे !
तिला बातमी कसे म्हणावे ?
जिच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
अर्ध संन्यास
ते मुत्सद्दीपणे म्हणाले,
निवडणुकीत पडणे नको
यापुढे कोणतीही
निवडणूक लढणे नको.
निवडणूक नको म्हणणे
ही राजकीय निवृत्ती नाही!
पंतप्रधानपदाचा दावा सोडणे
ही त्यांची वृत्ती नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
निवडणुकीत पडणे नको
यापुढे कोणतीही
निवडणूक लढणे नको.
निवडणूक नको म्हणणे
ही राजकीय निवृत्ती नाही!
पंतप्रधानपदाचा दावा सोडणे
ही त्यांची वृत्ती नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, January 28, 2012
राजकीय 'फुट'कळपणा
इथे फक्त फोडणारा पाहिजे
फुटणारांना कमी नाही.
कोण आणि कधी फुटेल?
याची मुळीच हमी नाही.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत
फुटकळ नेत्यांची गर्दी आहे!
राजकारण कुठे चाललेय?
याचीच ही वर्दी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
फुटणारांना कमी नाही.
कोण आणि कधी फुटेल?
याची मुळीच हमी नाही.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत
फुटकळ नेत्यांची गर्दी आहे!
राजकारण कुठे चाललेय?
याचीच ही वर्दी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, January 27, 2012
दगाबाज
फटाफट फुटतोय
तो विश्वासाचा फुगा आहे.
विश्वासही बसत नाही
त्यांच्याकडूनच दगा आहे.
पिसाळांच्या सूर्याजीची
आठवण आज आहे !
कालपर्यंतचा निष्टावंतच
खरा दगाबाज आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
तो विश्वासाचा फुगा आहे.
विश्वासही बसत नाही
त्यांच्याकडूनच दगा आहे.
पिसाळांच्या सूर्याजीची
आठवण आज आहे !
कालपर्यंतचा निष्टावंतच
खरा दगाबाज आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, January 26, 2012
षंढखोरी
इकडे बंड, तिकडे बंड
वाटते ही बंडखोरी आहे.
खरी वस्तुस्थिती अशी की,
ही तर षंढखोरी आहे.
बंड नेमके कुणासाठी?
केवळ स्वार्थापोटी बंड आहे!
जोडीदार बदलून उपयोग नाही
जो मुळातच षंढ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
वाटते ही बंडखोरी आहे.
खरी वस्तुस्थिती अशी की,
ही तर षंढखोरी आहे.
बंड नेमके कुणासाठी?
केवळ स्वार्थापोटी बंड आहे!
जोडीदार बदलून उपयोग नाही
जो मुळातच षंढ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, January 24, 2012
गण (गण) राज्य
इकडे गण गण, तिकडे गण गण
सगळीकडे गण गण असते.
त्याच त्याच समस्यांसाठी
कायमचीच वणवण असते.
भरणार्यांची घरे भरली
प्रजेच्या हाती पूज्य आलेले आहे!
भारतीय गणराज्याचे
गण गण राज्य झालेले आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
सगळीकडे गण गण असते.
त्याच त्याच समस्यांसाठी
कायमचीच वणवण असते.
भरणार्यांची घरे भरली
प्रजेच्या हाती पूज्य आलेले आहे!
भारतीय गणराज्याचे
गण गण राज्य झालेले आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, January 23, 2012
षंढखोरी
इकडे बंड, तिकडे बंड
वाटते ही बंडखोरी आहे.
खरी वस्तुस्थिती अशी की,
ही तर षंढखोरी आहे.
बंड नेमके कुणासाठी?
केवळ स्वार्थापोटी बंड आहे!
जोडीदार बदलून उपयोग नाही
जो मुळातच षंढ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
वाटते ही बंडखोरी आहे.
खरी वस्तुस्थिती अशी की,
ही तर षंढखोरी आहे.
बंड नेमके कुणासाठी?
केवळ स्वार्थापोटी बंड आहे!
जोडीदार बदलून उपयोग नाही
जो मुळातच षंढ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, January 21, 2012
आनंदी - आनंद
कुणी आमदार गळाला लावतोय
कुणी खासदार गळाला लावतोय.
कुणी आपली रिकामी घागर
थेट सत्तेच्या नळाला लावतोय.
कचा कचा वाकतात तरी
सांगतात मी स्वाभीमानी आहे!
निष्ठेच्या गप्पा मारणे म्हणजे
पालथ्या घागरीवर पाणी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणी खासदार गळाला लावतोय.
कुणी आपली रिकामी घागर
थेट सत्तेच्या नळाला लावतोय.
कचा कचा वाकतात तरी
सांगतात मी स्वाभीमानी आहे!
निष्ठेच्या गप्पा मारणे म्हणजे
पालथ्या घागरीवर पाणी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, January 20, 2012
का...का...का?
घराणेशाहीवरच्या टीका
कराव्या तेवढय़ा थोडय़ा आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात
सर्वत्र काका-पुतण्याच्याच जोडय़ा आहेत.
तुमच्या आमच्या हाती काय?
सर्वकाही पुतण्या आणि काकाचे आहे!
कितीही लपवले तरी कळते
त्यांचे भांडे ताकाचे आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कराव्या तेवढय़ा थोडय़ा आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात
सर्वत्र काका-पुतण्याच्याच जोडय़ा आहेत.
तुमच्या आमच्या हाती काय?
सर्वकाही पुतण्या आणि काकाचे आहे!
कितीही लपवले तरी कळते
त्यांचे भांडे ताकाचे आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, January 19, 2012
नो चॉईस
यांचे त्यांना, त्यांचे यांना
राजकीय चेक असतात.
राजकीय तडजोडीवरून कळते
शेवटी सगळेच एक असतात.
घाण चिवडावी तसे
प्रचारात मुद्दे चिवडले जातात!
निवडायच्या लायकीचे नसले तरी
कुणीतरी निवडले जातात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
राजकीय चेक असतात.
राजकीय तडजोडीवरून कळते
शेवटी सगळेच एक असतात.
घाण चिवडावी तसे
प्रचारात मुद्दे चिवडले जातात!
निवडायच्या लायकीचे नसले तरी
कुणीतरी निवडले जातात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, January 18, 2012
मुद्द्यावरून गुद्द्याकडॆ
काय केले? काय राहिले?
याचा कुठे लेखाजोखा असतो?
परस्परांच्या बदनामीवरच
प्रचारामध्ये ठोका असतो.
मुद्द्यावरून गुद्द्याकडे येवून
मुद्दे अडगळीत पडल्या जातात !
सामाजिक मुद्दे सोडून
निवडणूका लढल्या जातात !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
याचा कुठे लेखाजोखा असतो?
परस्परांच्या बदनामीवरच
प्रचारामध्ये ठोका असतो.
मुद्द्यावरून गुद्द्याकडे येवून
मुद्दे अडगळीत पडल्या जातात !
सामाजिक मुद्दे सोडून
निवडणूका लढल्या जातात !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
घरगुती मामला
पूर्वी पक्ष फोडायचे
आता म्हणे घरं फोडली जातात.
राजकीय प्रचारात
घरगुती उणी दुणी काढली जातात.
पक्षीय राजकारण
नको तेवढे घरगुती होत आहे!
लोकांसोबत कार्यकर्तेही वैतागले
सगळेच अती होत आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आता म्हणे घरं फोडली जातात.
राजकीय प्रचारात
घरगुती उणी दुणी काढली जातात.
पक्षीय राजकारण
नको तेवढे घरगुती होत आहे!
लोकांसोबत कार्यकर्तेही वैतागले
सगळेच अती होत आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, January 17, 2012
सत्ता नावाचे सत्य
नीट बघा, कोण कुठे आहे?
कोण कुठे आहे?
सत्ता हेच अंतिम सत्य
यात काय खोटे आहे?
सत्ता नावाच्या सत्यासमोर
बाकी सबकुछ झूठ आहे!
युद्ध, प्रेम आणि राजकारणात
सर्व काही सूट आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कोण कुठे आहे?
सत्ता हेच अंतिम सत्य
यात काय खोटे आहे?
सत्ता नावाच्या सत्यासमोर
बाकी सबकुछ झूठ आहे!
युद्ध, प्रेम आणि राजकारणात
सर्व काही सूट आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
नाते आणि गोते
नात्या-गोत्यात राजकारण
हल्ली भलतेच फॉर्मात आहे.
आयुष्यभर कार्यकर्ता राहणे
कार्यकत्र्यांच्या कर्मात आहे
नात्यामुळे गोत्यात येते
हे जरी कळले जाते!
तरीही नात्या-गोत्याचेच
राजकारण खेळले जाते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
हल्ली भलतेच फॉर्मात आहे.
आयुष्यभर कार्यकर्ता राहणे
कार्यकत्र्यांच्या कर्मात आहे
नात्यामुळे गोत्यात येते
हे जरी कळले जाते!
तरीही नात्या-गोत्याचेच
राजकारण खेळले जाते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, January 15, 2012
ब्ल्यू थिफ
कुणी वजन इकडून टाकलेप
कुणी वजन तिकडून टाकले.
सत्तेच्या तुकडय़ासाठी
चळवळीला जखडून टाकले.
वैयक्तिक अहंकार नडतोय
कुणीच वेडापिसा नाही!’
’सत्ताधारी जमात व्हा’
याचा अर्थ असा नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणी वजन तिकडून टाकले.
सत्तेच्या तुकडय़ासाठी
चळवळीला जखडून टाकले.
वैयक्तिक अहंकार नडतोय
कुणीच वेडापिसा नाही!’
’सत्ताधारी जमात व्हा’
याचा अर्थ असा नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, January 14, 2012
निळे दु:ख
दलित मतांची फाटाफूट
ज्याला त्याला हवी आहे.
डोक्यात ’प्रकाश’ पडला
नामदेव नेता नाही,कवी आहे.
कुणी महाआघाडीत,
कुणी महायुतीत आहे.
नेत्यांच्या फाटाफूटीने
जनता मात्र व्यथित आहे.
असा एकही जण नाही,
जो सत्तेसाठी झुरला नाही !
एकेकाळच्या वाघांचा
म्हणूनच धाक उरला नाही !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
ज्याला त्याला हवी आहे.
डोक्यात ’प्रकाश’ पडला
नामदेव नेता नाही,कवी आहे.
कुणी महाआघाडीत,
कुणी महायुतीत आहे.
नेत्यांच्या फाटाफूटीने
जनता मात्र व्यथित आहे.
असा एकही जण नाही,
जो सत्तेसाठी झुरला नाही !
एकेकाळच्या वाघांचा
म्हणूनच धाक उरला नाही !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
राजकीय वयोमर्यादा
राजकारणातच रिटायर होण्याचे
कुठे कुणाला टेन्शन आहे?
घरी बसल्या बसल्या
पुन्हा आयती पेन्शन आहे
पेन्शनचे काही नाही
गरजवंतानी ती घेतली पाहिजे!
राजकारणाला वयाची
कमाल अट घातली पाहिजे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुठे कुणाला टेन्शन आहे?
घरी बसल्या बसल्या
पुन्हा आयती पेन्शन आहे
पेन्शनचे काही नाही
गरजवंतानी ती घेतली पाहिजे!
राजकारणाला वयाची
कमाल अट घातली पाहिजे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, January 13, 2012
ज्याचे त्याचे वजन
याचे नाही तर त्याचे
तिकीट घेतले जाते.
ओतायचे तेवढे वजन
पारडय़ात ओतले जाते.
ज्याचे वजन जास्त
त्याची तिकिटावर मालकी असते!
वजनापेक्षा निष्ठा
कितीतरी हलकी असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
तिकीट घेतले जाते.
ओतायचे तेवढे वजन
पारडय़ात ओतले जाते.
ज्याचे वजन जास्त
त्याची तिकिटावर मालकी असते!
वजनापेक्षा निष्ठा
कितीतरी हलकी असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, January 12, 2012
देर आये दुरुस्त आये
एवढे वाभाडे निघूनही
व्यवस्था कुठे शरमली आहे?
म्हणायला सोपे जाते
टीम अण्णा नरमली आहे.
झाले ते बरे झाले
कुणाविरुद्धच प्रचार नको आहे!
टीम अण्णाचा आवाज म्हणजे
सामान्य जनतेचा इको आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
व्यवस्था कुठे शरमली आहे?
म्हणायला सोपे जाते
टीम अण्णा नरमली आहे.
झाले ते बरे झाले
कुणाविरुद्धच प्रचार नको आहे!
टीम अण्णाचा आवाज म्हणजे
सामान्य जनतेचा इको आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, January 11, 2012
सेनाच सेना
सैनिकांच्या खांद्यावरती
सेनापतींचा मेणा आहे.
दररोज उगवलेली
कसली ना कसली सेना आहे.
सैनिकांशी सैनिकांचे
अधूनमधून युद्ध होते!
सेना आणि सेनापतीबरोबर
सैनिकांचे अस्तित्वही सिद्ध होते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
सेनापतींचा मेणा आहे.
दररोज उगवलेली
कसली ना कसली सेना आहे.
सैनिकांशी सैनिकांचे
अधूनमधून युद्ध होते!
सेना आणि सेनापतीबरोबर
सैनिकांचे अस्तित्वही सिद्ध होते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, January 10, 2012
मुडदेबाजी
मुडदेबाजी
सगळे अनिष्ट प्रकार
निवडणूक काळातच घडले जातात.
लोकशाहीचे मुडद्यावर मुडदे
निवडणूक काळातच पाडले जातात.
हे उघडय़ा डोळ्यांनी बघणारेच
जिवंत मुडदे असतात!
गुन्हेगारांच्या गुन्ह्यावर
पडद्यावर पडदे असतात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
सगळे अनिष्ट प्रकार
निवडणूक काळातच घडले जातात.
लोकशाहीचे मुडद्यावर मुडदे
निवडणूक काळातच पाडले जातात.
हे उघडय़ा डोळ्यांनी बघणारेच
जिवंत मुडदे असतात!
गुन्हेगारांच्या गुन्ह्यावर
पडद्यावर पडदे असतात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, January 9, 2012
पोपटी विचारवंत
समोर एक, मागे एक
बोलण्याचे धंदे असतात.
पोपटी विचारवंत
सत्ताधार्यांचे मिंधे असतात.
त्यांनी मांडलेले विचार म्हणजे
बाष्कळ पोपटपंची असते!
पुरस्कार आणि पदांएवढीच
त्यांची वैचारिक उंची असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
बोलण्याचे धंदे असतात.
पोपटी विचारवंत
सत्ताधार्यांचे मिंधे असतात.
त्यांनी मांडलेले विचार म्हणजे
बाष्कळ पोपटपंची असते!
पुरस्कार आणि पदांएवढीच
त्यांची वैचारिक उंची असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, January 8, 2012
सारे काही तिकिटासाठी..
इकडे घुसू की तिकडे घुसू?
दोन्ही-तिन्ही दगडीवर हात आहे.
पक्ष कोणताही असला तरी
तिकीट मिळण्याशी बात आहे.
शेवटी तिकीट महत्त्वाचे
पक्ष-बिक्ष सबकुछ झूठ आहे!
उघडी कशाला करायची?
ही तर झाकलेली मूठ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
दोन्ही-तिन्ही दगडीवर हात आहे.
पक्ष कोणताही असला तरी
तिकीट मिळण्याशी बात आहे.
शेवटी तिकीट महत्त्वाचे
पक्ष-बिक्ष सबकुछ झूठ आहे!
उघडी कशाला करायची?
ही तर झाकलेली मूठ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, January 7, 2012
बंडाची लाट
आवरता येत नाही
राजकीय कंडाला.
सर्वत्र सुरुवात झाली
पक्षीय बंडाला.
कंडोबाशी बंडोबाचे
जन्मजात नाते असते!
जुन्याच राजकीय वहीवर
स्वतंत्र खाते असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
राजकीय कंडाला.
सर्वत्र सुरुवात झाली
पक्षीय बंडाला.
कंडोबाशी बंडोबाचे
जन्मजात नाते असते!
जुन्याच राजकीय वहीवर
स्वतंत्र खाते असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, January 1, 2012
नववर्षाचे स्वागत
नववर्षाच्या स्वागताची
ज्याची त्याची रित असते.
ते ते सोबतीला लागते
ज्याच्यावरती प्रीत असते.
कसे साजरे करू? कसे नाही?
असेच सर्वाना झालेले असते!
शुद्धीवर येतात तेव्हा
नवीन वर्षही आलेले असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
ज्याची त्याची रित असते.
ते ते सोबतीला लागते
ज्याच्यावरती प्रीत असते.
कसे साजरे करू? कसे नाही?
असेच सर्वाना झालेले असते!
शुद्धीवर येतात तेव्हा
नवीन वर्षही आलेले असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...