Sunday, September 5, 2010

आदर्शांचे चिंतन

आदर्श शिक्षक पुरस्कार
ही तर एक मौज आहे.
शिक्षक दिनालाच कळते
आपल्याकडे आदर्शांची फौज आहे.

कुणी ओढलेले आहेत,
कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत.
स्पर्धेत जिंकता जिंकता हरले
असे कितीतरी दडलेले आहेत.

पुरस्कार आणि शैक्षणिक दर्जा
यांचा मेळ कसाच जुळत नाही !
तरीही भारत महासत्ता होणार
हे काही कळता कळत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

mangeshjoshi said...

खुपच छान... या पेक्षा शिक्षक दिनाचे उत्तम वर्णन होउच शकत नाही...

धन्यवाद .. आम्हाला तुमचे साहित्य उपलब्ध केल्या बद्दल ...

मंगेश जोशी - केप टाउन, दक्षिण अफ्रीका

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...