तुला म्हणून खरे सांगते
अगं,पहिलेच दिवस बरे होते.
आमचे हे म्हणजे ना,
अगदी अवखळ गोर्हे होते.
माझ्या हाती कासरा आला
त्यांना बैलोबा करून टाकले आहे !
सत्ताधारी असतानाही
मी खर्या आनंदाला मुकले आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment