Thursday, August 16, 2012

स्वातंत्र्य आहे साक्षीला....

स्वातंत्र्यालाही माहीत नसेल
इथे पुन्हा लढाया लढल्या जातील.
आपल्याकडून आपल्यालाच
इथे पुन्हा बेड्या पडल्या जातील.

स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क
इथे पुन्हा पुन्हा मागावा लागेल.
स्वातंत्र्याचा इतिहास
पुन्हा पुन्हा जागावा लागेल.

स्वातंत्र्याचे सुदैव की दुर्दैव?
हे अजून ठरायचे आहे !
स्वातंत्र्यप्राप्तीइतकेच काम
स्वातंत्र्य टिकविण्यासाठी करायचे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...