Monday, April 26, 2010

आयपीएल घोटाळा

***** आजची वात्रटिका ******
**********************

आयपीएल घोटाळा

खेळात मनोरंजन घातले की,
त्याचा बरोबर सेल होतो.
खेळात राजकारण घुसले की,
त्याचा आयपीएल होतो.

राजकीय भेसळ किती असावी?
यालाही ठराविक माप आहे !
आयपीएल घोटाळा साधा नाही
तो तर बोफोर्सचा बाप आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

1 comment:

विजयसिंह होलम said...

मनोरंजनाचा बाजार
खेळाचे राजकारण.
दोघांच्या घोटाळ्यात
बिघडले अर्थकारण.

थरूर झाले झेलबाद
मोदींचा उडाला त्रिफळा.
पटेलांच्या प्रफुल्लला
चाटून गेल्या झळा.

दैनिक वात्रटिका l 6 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 307 वा l पाने -57

आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 6 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 307 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1W9ND5N9la0-...