Showing posts with label अनुभव हीच खात्री. Show all posts
Showing posts with label अनुभव हीच खात्री. Show all posts

Thursday, April 30, 2020

अनुभव हीच खात्री

आजची वात्रटिका
-------------------------------------
अनुभव हीच खात्री
साऱ्या जगाला गॅरंटी वाटते,
चीन हेच कोरोनाचे कूळ आहे.
नुकसान भरपाईची मागणी
हे त्याचेच तर खरे मूळ आहे.
नकली मालवाला म्हणून,
आता चीनला कोण हिणवू शकतो ?
चीननेही जगाला दाखवून दिले,
आम्हीही गॅरंटेड माल बनवू शकतो !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7271
दैनिक झुंजार नेता
30एप्रिल2020
-----------------------------
#कोरोना

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...