Showing posts with label आव्हानांची ऐशीतैशी... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label आव्हानांची ऐशीतैशी... मराठी वात्रटिका. Show all posts

Wednesday, February 8, 2023

आव्हानांची ऐशीतैशी... मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
----------------------------

आव्हानांची ऐशीतैशी

एकाने आवाज चढवला की,
दुसराही आवाज चढवून दाखवतो.
कुणी म्हणतो;इकडे उभे रहा,
कुणी म्हणतो,मी लढवून दाखवतो.

कुठे आव्हानाला प्रति आव्हान,
कुठे आव्हानाकडे काना डोळा आहे!
कुणाची अळीमिळी गुपचिळी,
कुणाचा आपला उगीचच गळा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8171
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8फेब्रुवारी 2023

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...