Showing posts with label एप्स्टिन फाईल्स आजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label एप्स्टिन फाईल्स आजची वात्रटिका. Show all posts

Sunday, February 8, 2026

एप्स्टिन फाईल्स ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
एप्स्टिन फाईल्स
तसा हा वादाचा मुद्दा आहे,
वादग्रस्त ठरवली की ठरली आहे?
प्रत्यक्ष धर्मगुरू आणि वैज्ञानिकानेही,
फाईलमध्ये झक मारली आहे.
धर्मगुरू आणि वैज्ञानिकांंबरोबर,
उद्योगपतींचेही काळे धंदे आहेत.
राजकारणी तर त्यात आहेतच,
ते तर हुकूमाचेच बंदे आहेत.
एप्स्टिन तर केव्हाच मेला,
त्याच्या फाईलचे भूत जिवंत आहे !
जगाचे आयडॉल नागडे होत आहेत ,
याची जेवढी चीड,तेवढीच खंत आहे ! !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9183
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7 फेब्रुवारी 2026

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...