Showing posts with label कुणाला शिवथाळीची ऑफर आहे.. Show all posts
Showing posts with label कुणाला शिवथाळीची ऑफर आहे.. Show all posts

Sunday, June 20, 2021

शिव.. शिव.. शिव..

आजची वात्रटिका
---------------------

शिव.. शिव.. शिव..

कुणाला दिला शिवप्रसाद,
कुणाला शिवथाळीची ऑफर आहे.
राजकीय राड्यामध्ये,
शिवराळ शब्दांचा वापर आहे.

त्यांचा शाब्दिक 'सामना' तर
रोज नव्याने रंगतो आहे !
शाब्दिक प्रहारावर प्रहार करून,
एकमेकांची वेशीला टांगतो आहे !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6181
दैनिक पुण्यनगरी
20जून2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...