आजची वात्रटिका
--------------------------
कॉमेडीचा बॅड शो
विनोदाचे तारतम्य सुटले की,
स्टँड अप कॉमेडी फसली जाते.
विनोद कंबरेखाली गेला की,
स्टँड अप कॉमेडी बसली जाते.
आचकट विचकट अश्लीलता,
स्टँड अप कॉमेडीची ऊर्जा आहे.
उघड्या तमाशापेक्षाही खालचा,
स्टँड अप कॉमेडीचा दर्जा आहे.
कमरेखालचे विनोदच,
त्यांच्या कॉमेडीचा स्टॅन्ड असतो !
पैसा फेको तमाशा देखो,
कॉमेडीच्या जोडीला बँड असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9305
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
12 जून 2026
