Showing posts with label कोरोना रिपोर्ट. Show all posts
Showing posts with label कोरोना रिपोर्ट. Show all posts

Thursday, February 18, 2021

कोरोना रिपोर्ट

आजची वात्रटिका
----------------------

कोरोना रिपोर्ट

कोरोना गेलाच नव्हता तर,
कोरोना परत येईलच कसा?
तो बोलून चालून कोरोना आहे,
कोरोना परत जाईलच कसा?

मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन,
कोरोनाकडे अहंकारी भाषा नाही!
आपला अहंकार जात नाही,
तो पर्यंत तो जायची आशा नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-6065
दैनिक पुण्यनगरी
18फेब्रुवारी2021

 

Saturday, March 7, 2020

कोरोना रिपोर्ट

आजची वात्रटिका
----------------------------------------
कोरोना रिपोर्ट
कुणाच्या व्यवसायाला संधी,
कुणाच्या व्यवसायावर गदा आहे.
तरीही आपल्या भारतावर,
कोरोना व्हायरस फिदा आहे.
आपल्यावर कोरोनाने फिदा होणे,
अगदीच रास्त आहे !
अफवांच्या व्हायरसचा वेग,
आपल्याकडे सर्वात जास्त आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5740
दैनिक पुण्यनगरी
7मार्च 2020

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...