Showing posts with label तुलनात्मक विचार. Show all posts
Showing posts with label तुलनात्मक विचार. Show all posts

Friday, January 2, 2026

तुलनात्मक विचार ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
तुलनात्मक विचार
नेत्यांचा उद्रेक वेगळा असतो,
कार्यकर्त्यांचा उद्रेक वेगळा असतो.
उद्रेकाचा वेगवेगळेपणा सांगतो,
प्रत्येकाचा उद्रेक आगळा असतो.
कुठलेही नेते रडत बसत नाहीत,
कुठलेही नेते कुढत बसत नाहीत.
नेते कुठलेही असले तरी,
कार्यकर्त्यांसारखे सडत बसत नाहीत.
प्रत्येक नेत्यामागे असतात कार्यकर्ते,
कार्यकर्ता मात्र फक्त एकटा असतो !
नेत्यांच्या नाकाची उंची सांगते
प्रत्येक कार्यकर्ता नकटा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9149
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2जानेवारी 2026

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...