Showing posts with label दुखवटे आणि मुखवटे..... आजची वात्रटिका. Show all posts
Showing posts with label दुखवटे आणि मुखवटे..... आजची वात्रटिका. Show all posts

Sunday, February 1, 2026

दुखवटे आणि मुखवटे..... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
-------------------------------

दुखवटे आणि मुखवटे

त्यांचे चेहरे वेगळे आहेत, 
त्यांचे मुखवटेही वेगळे आहेत.
जसे त्यांचे आनंद सोहळे, 
तसे दुखवटेही वेगळे आहेत.

त्यांचे दुखवटे आणि मुखवटे,
यावर उलट सुलट चर्चा आहेत!
बाकी सगळे झूट निघाले,
सर्वात महत्त्वाच्या खुर्च्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 80
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
1 फेब्रुवारी 2026

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...