Showing posts with label नेतृत्वाचे वास्तव. Show all posts
Showing posts with label नेतृत्वाचे वास्तव. Show all posts

Saturday, October 3, 2026

नेतृत्वाचे वास्तव....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
नेतृत्वाचे वास्तव
एक ना धड भाराभर चिंध्या,
अशी नेतृत्वाची तऱ्हा आहे.
दगडापेक्षा वीट मऊ ठरवित,
त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे.
सगळे कसे संकुचित आहेत,
सर्व समावेशक कुठे दिसत नाहीत.
नेतृत्वाच्या चौकटीमध्ये,
बसवले तरी तरी ते बसत नाहीत.
जसा समाज, तसे नेतृत्व,
अशीच नेतृत्वाची अवस्था आहे !
पदरी पडलेले पवित्र होण्यासाठी,
निवडणूक नावाची व्यवस्था आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9416
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3 ऑक्टोबर 2026

 

नेतृत्वाचे वास्तव....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- नेतृत्वाचे वास्तव एक ना धड भाराभर चिंध्या, अशी नेतृत्वाची तऱ्हा आहे. दगडापेक्षा वीट मऊ ठरवित, त्...