Showing posts with label पियो और पीने दो. Show all posts
Showing posts with label पियो और पीने दो. Show all posts

Tuesday, May 5, 2020

पियो और पीने दो

आजची वात्रटिका
------------------------
पियो और पीने दो
कुणी म्हणतात,बरे झाले,
कुणी म्हणतात,बेकार झाले.
दारूडयांचे अधुरे स्वप्न,
रेड झोनमध्येही साकार झाले.
कुणासाठी दारू अनावश्यक,
कुणासाठी जीवनावश्यक वस्तू आहे !
ज्याला जे हवे ते मिळू दे,
टपलेल्या कोरोनाचे तथास्तू आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7275
दैनिक झुंजार नेता
5मे2020
-----------------------------

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...