Showing posts with label भ्रष्टाचार निर्मूलन. Show all posts
Showing posts with label भ्रष्टाचार निर्मूलन. Show all posts

Thursday, November 5, 2026

शपथ पूर्वक सांगतो की... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
--------------------

शपथपूर्वक सांगतो की, 

याची आहे ; त्याची आहे, 
शपथेवरती पुन्हा शपथ आहे.
सगळ्यांनाच वाटू लागले,
शपथ म्हणजे आफत आहे.

औपचारिकतेचा भाग म्हणून, 
शपथेवर शपथा घेतल्या जातात.
फोटो बिटो काढून झाले की,
शपथा मातीत घातल्या जातात.

असे फार कमी लोक असतील, 
ज्यांचा शपथविधी घडलेला नाही !
कितीतरी शपथा आल्या गेल्या,
कशातच फरक पडलेला नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9449
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
5 नोव्हेंबर 2026
----------------------------




कटू सत्य... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- कटू सत्य तेच सत्य मानले जाते जे आपल्याला रूचले जाते. तेच सत्य पचविले जाते जे आपल्य...