आजची वात्रटिका
-----------------------------
वर्धा साहित्य संमेलन
आपल्याच उदो उदोचा घाट आहे.
फक्त दिखाऊपणाचा थाटमाट आहे.
मायबाप रसिकांची मात्र,
साहित्य संमेलनाकडेच पाठ आहे.
जरी सरकारी अनुदानाची,
आता दोन कोटींची थैली आहे.
मराठी साहित्य संमेलनाची गंगा मात्र,
जणू सगळीकडूनच मैली आहे.
ना गर्दी आहे;ना दर्दी आहे,
घालमोड्यांनो ही धोक्याची वर्दी आहे.
ध चा मा तर होणारच,
कारण आपल्यामध्येच गारदी आहे.
सावध ऐका विद्रोहाच्या हाका,
प्रस्थापित नावाच्या झुली फेका हो!
जुने जाऊ द्या मरणालागून,
जळमटांचा तुम्हालाच खरा धोका हो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6711
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
5फेब्रुवारी2023
Showing posts with label वर्धा साहित्य संमेलन...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label वर्धा साहित्य संमेलन...मराठी वात्रटिका. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)
स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...
