Showing posts with label वाद अपवाद. Show all posts
Showing posts with label वाद अपवाद. Show all posts

Sunday, February 1, 2026

वाद अपवाद.....साप्ताहिक वात्रटिका

साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------
वाद अपवाद
असा शासकीय पुरस्कार नसतो,
ज्याच्यावर वादविवाद घडला नाही.
असा योगायोग कधीतरीच येतो,
विरोधक सरकारला भिडला नाही.
तळे राखील तो पाणी चाखील,
ही म्हण सर्वांनाच लागू पडत असते.
लोखंड पितळाला पुरस्कारांचा मुलामा,
अस्सल सोने पुन्हा पुन्हा सडत असते.
पुरस्कारांचा नियम सिद्ध होण्यासाठी,
कधीमधी अपवाद तयार केला जातो !
शेकड्यातला एखादाच पुरस्कार,
योग्य त्या हक्कदाराला दिला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 71
वर्ष- दुसरे
31जानेवारी 2026

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...