Showing posts with label सत्तामेव जयते...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label सत्तामेव जयते...मराठी वात्रटिका. Show all posts

Saturday, February 18, 2023

सत्तामेव जयते...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सत्तामेव जयते

आपल्या 'सत्यमेव जयते' चे
कधीच 'सत्तामेव जयते' झाले आहे.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत,
हेच सतत अनुभवाला झाले आहे.

एकदा सत्ता हेच सत्य बनली की,
सत्यालाही मागे पळावे लागते!
सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही,
हे सत्य अनुभवाने कळावे लागते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6723
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
18फेब्रुवारी2023
 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...