Showing posts with label सत्तार्थी. Show all posts
Showing posts with label सत्तार्थी. Show all posts

Tuesday, October 27, 2020

सत्तार्थी

आजची वात्रटिका
------------------------------
सत्तार्थी
आपण म्हणतो,राजकीय नेते;
विश्वासघातकी आणि स्वार्थी आहेत.
पण ते ना विश्वासघातकी,ना स्वार्थी,
ते फक्त आणि फक्त सत्तार्थी आहेत.
विश्वासघात आणि स्वार्थ,
हे शब्द खूप अलिकडचे आहेत !
पण सत्तार्थी सत्तार्थी असतात,
ते त्याहूनही पलिकडचे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5956
दैनिक पुण्यनगरी
27ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
----------------------------

1 Share



लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...