Showing posts with label सरणफुके...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label सरणफुके...मराठी वात्रटिका. Show all posts

Thursday, February 9, 2023

सरणफुके...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------

सरणफुके

भक्त फक्त आंधळेच नाही तर,
बहिरे आणि मुके असतात.
त्यांना एकच उपमा आहे,
भक्त सरणफुके असतात.

आंधळ्या भक्तांची,
निष्ठासुद्धा आंधळी असते !
आंधळ्या भक्तांची जातच,
गोंधळी आणि गोंधळी असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8172
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9फेब्रुवारी 2023
 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...