Showing posts with label हे 'करुणा' करा !. Show all posts
Showing posts with label हे 'करुणा' करा !. Show all posts

Saturday, January 16, 2021

हे 'करुणा' करा !

आजची वात्रटिका
----------------------
हे 'करुणा' करा !
एकीकडे निशाणा असूनही,
बाण दुसरीकडे घुसू लागले.
ज्याचे त्याचे भूतकाळ,
समोर येऊन आ वासू लागले.
आपल्या भूतकाळाचे,
आपणच तर बाप असतो !
जर मानगुटीवर बसला तर,
भूतकाळ हा शाप असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7498
दैनिक झुंजार नेता
16जानेवारी2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...