Showing posts with label ...... आजची बातमी. Show all posts
Showing posts with label ...... आजची बातमी. Show all posts

Tuesday, February 24, 2026

दुश्मन दावा ...... आजची वात्रटिका



आजची वात्रटिका 
-----------------------------

दुश्मन दावा 

निसर्गाचा खटका आहे,
अवकाळीचा झटका आहे.
शेती आणि शेतकऱ्याला,
सगळीकडूनच फटका आहे. 

पहिली भरपाई मिळेपर्यंत, 
दुसऱ्या नुकसानीचा धावा आहे!
खालच्या आणि वरच्या सरकारचा, 
शेतकऱ्यांशी दुश्मन दावा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 93
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
24 फेब्रुवारी 2026

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...