Wednesday, September 9, 2020

गहरी चाल


 आजची वात्रटिका

---------------------------
गहरी चाल
तुम्ही झुकत नाही म्हटले की,
सगळीकडून ताणले जाते.
जाळ्यावर जाळे टाकून,
तुम्हांला गोत्यात आणले जाते.
तरीही अडकला नाहीत तर,
ते जास्तच बिथरले जातात.
सगळे नैतिक मार्ग संपले की,
अनैतिकतेवर उतरले जातात.
तुम्हांला नामोहरम करायला,
बदनामीचे अस्त्र उगारले जाते !
एकदाच मारून टाकण्यापेक्षा,
रोज नव्याने मारले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5910
दैनिक पुण्यनगरी
9सप्टेंबर2020

सूर्यकांती लाईव्ह

सूर्यकांती Liveक्लिक करा

Tuesday, September 8, 2020

कोरोना सेल


गदारोळ


 आजची वात्रटिका

---------------------------

गदारोळ

हिंदी फिल्न जगताने, राजकारण हॅक केले आहे. मिडीयाने बाकी विषयांना, सध्या तरी पॅक केले आहे.

वाद व्हावा,संवाद व्हावा; वितंडवादाचा धोका आहे! एवढ्या सगळ्या गदारोळात, कोरोना मात्र फिका आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5909 दैनिक पुण्यनगरी 8सप्टेंबर2020

Monday, September 7, 2020

दैनिक वात्रटिका 7सप्टेंबर2020

डाऊनलोड लिंक

डॉनचा फोन


 आजची वात्रटिका

---------------------------

डॉनचा फोन

मेला की जित्ता आहे? याकडे लक्ष कोण देतो? पण अधून-मधून दाऊदचा, दुबईवरून फोन येतो.

पाकिस्ताच्या टिमक्या, दाऊदच्या धमक्या, दोघांनाही मरण नाही ! आपण खमक्या असलो की, घाबरण्याचे कारण नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5908 दैनिक पुण्यनगरी 7सप्टेंबर2020

कोरोनाचे देणे


 आजची वात्रटिका

---------------------------
कोरोनाचे देणे
आपलेच जुने विक्रम,
कोरोना तोडतो आहे.
चांगल्या-वाईट परंपरा,
कोरोना मोडतो आहे.
नवे रूप,नवा वाण,
कोरोना कडू बेणे आहे !
पंतप्रधान सहा महिने
देशातच राहिले
हे कोरोनाचेच देणे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7398
दैनिक झुंजार नेता
7सप्टेंबर2020-

दैनिक वात्रटिका6सप्टेंबर2020

डाऊनलोड लिंक क्लिक

Sunday, September 6, 2020

दैनिक वात्रटिका 5सप्टेंबर2020

डावूनलोडसाठी क्लिक करा

हॅलो, माय टेस्टींग,


 आजची वात्रटिका

----------------------------

हॅलो, माय टेस्टींग,

हॅलो,माय टेस्टींग, कोरोनाचा पुकार आहे. जो राहील गाफील, तो कोरोनाची शिकार आहे.

तो तो निगेटिव्ह, जो जो गाफील नाही ! कोरोनाच्या गुन्ह्याला, आज तरी अपील नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7397 दैनिक झुंजार नेता 6सप्टेंबर2020

परीक्षा


 आजची वात्रटिका

----------------------------
परीक्षा
कुणाला पावला कोरोना देव,
कुणाला कोरोना देवी पावली आहे.
केजी टू पीजी च्या परीक्षांची,
कोरोनाने पुरती वाट लावली आहे.
कोरोनाचा प्रश्न एवढा कठीण की,
सगळी उत्तरे आज तरी झूठ आहेत !
अवघ्या जगाच्या परीक्षेपुढे,
बाकी परीक्षा छाट-छूट आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5907
दैनिक पुण्यनगरी
6सप्टेंबर2020

Saturday, September 5, 2020

गुरुजी, धन्यवाद

आजची वात्रटिका
----------------------------
गुरुजी, धन्यवाद
जे शिक्षण ऑफलाईन होते,
ते ऑनलाईन सुरू झाले.
बघता बघता आमचे गुरुजी,
आता ऑनलाईन गुरू झाले.
ऑफलाईन-ऑनलाईनची,
आज तारेवरची सर्कस आहे !
गुरुजी झाले कोरोनायोद्धे,
गुरुजींना आमचा सलाम,
तिरकस नाहीतर जोरकस आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7396
दैनिक झुंजार नेता
5सप्टेंबर2020

 

ऑनलाईनची गदा


 आजची वात्रटिका

----------------------------
ऑनलाईनची गदा
आधीच उल्हास होता,
त्यात कोरोनाचा मास आहे
सरकारी कार्यालयात,
सुटकेचा निःश्वास आहे.
लाल फितीच्या कारभारावर,
जणू कोरोना फिदा आहे !
आता ऑफलाईन बरोबर
ऑनलाईनची गदा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5906
दैनिक पुण्यनगरी
5सप्टेंबर2020

Friday, September 4, 2020

कोरोनाष्टक


 आजची वात्रटिका

----------------------------
कोरोनाष्टक
सहा महिने मुक्काम ठोकूनही
कोरोना कळायला राजी नाही.
सगळे लाड पुरवून घेऊनही,
कोरोना पळायला राजी नाही.
सगळीकडेच कोरोनाने,
चांगलेच पाय रोवले आहेत !
तरीही कोरोनाने अजून,
हातचे राखून ठेवले आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7395
दैनिक झुंजार नेता
4सप्टेंबर2020

तोंड ओळख


 तोंड ओळख


एकाची जीभ सैल सुटली की,
दुसऱ्याचीही सैल सुटू लागते.
परस्परांची पोलखोल होताच,
गुपितांना वाचा फुटू लागते.

वाचाळतेबरोबरच मग
गचाळतेलाही उधाण येते !
ज्याच्या त्याच्या उथळतेचे,
स्वतः च्या तोंडून निदान होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5905
दैनिक पुण्यनगरी
4सप्टेंबर2020

Thursday, September 3, 2020

मंदिर मुक्ती


 आजची वात्रटिका

----------------------------
मंदिर मुक्ती
मंदिरे खुली करा म्हणताना,
भलते-सलते दिसू लागले.
कालचे कट्टर नास्तिक,
आज आस्तिक भासू लागले.
मंदिरे उघडण्याच्या भूमिकांचे,
अगदी लंगडे समर्थन आहे !
प्रत्यक्ष देवही अचंबित होतील,
असेच राजकीय वर्तन आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7394
दैनिक झुंजार नेता
3सप्टेंबर2020
-----------------------------

व्यावहारिक सोय


 आजची वात्रटिका

------------------------------
व्यावहारिक सोय
टेबलावरून मागितले की,
नियम दाखवले जातात.
टेबलाखालून दिले की,
नियम वाकवले जातात.
देणारा आणि घेणारांनाही,
नियमात काम चालत नाही !
लाचारांची जोडी जमली की,
कुणीच काही बोलत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5904
दैनिक पुण्यनगरी
3सप्टेंबर2020
-----------------------------

Tuesday, September 1, 2020

मन की बात


 आजची वात्रटिका

-------------------------

मन की बात

मन की बात सांगायचीही,
आता चोरी वाटू लागली.
आपणही 'ट्रोल' होवू शकतो,
याचीही भीती वाटू लागली.

मन की बात म्हणजे,
बोलणे सुख-दुःखाचे आहे !
आमच्यासोबत तेही भाग्यवान,
ज्यांना 'मन की बात'साठी,
घरी कुणीतरी हक्काचे आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5903
दैनिक पुण्यनगरी
1सप्टेंबर2020

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...