Tuesday, November 3, 2020

डबल बार


 आजची वात्रटिका

---------------------------

डबल बार

पहिल्याच लाटेत, लागली सगळी वाट. तोपर्यंत चर्चेत कोरोनाची दुसरी लाट.

अफवांच्या लाटेवर, कोरोना स्वार आहे ! दुसरी लाट म्हणजे, कोरोनाचा डबल बार आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5963 दैनिक पुण्यनगरी 2नोव्हेंबर2020
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

Monday, November 2, 2020

जिद्द

आजची वात्रटिका
---------------------------

जिद्द

एका कोरोनाग्रस्ताच्या जिद्दीवर
कोरोनाही फिदा झाला.
जो कोणीही करणार नाही,
असा त्याने कोरोनाशी वादा केला.

कोरोना तर फिदा झाला,
आपल्यासारखा चक्रावून जाईल !
तो पेशंट कोरोनाला सांगत होता,
मी पुन्हा येईल,मी पुन्हा येईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7450
दैनिक झुंजार नेता
2नोव्हेंबर2020
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

 

चौकशीचा फेरा


 आजची वात्रटिका

---------------------------

चौकशीचा फेरा

कालच्या आदर्श योजनांमागे, आज चौकशीचा फेरा असतो. गडबड आणि घोटाळ्यांबरोबर, आज संशयाचा शेरा असतो.

हे प्रकार काही नवे नाहीत, याला राजकीय इतिहास आहे ! घडत आले,घडत राहील, त्याला कारणही तसे खास आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5962 दैनिक पुण्यनगरी 2नोव्हेंबर2020 -----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

Sunday, November 1, 2020

अन्याय नावाचा त्याग


 आजची वात्रटिका

---------------------------

अन्याय नावाचा त्याग

अन्याय सहन करणाराला, पक्षात निष्ठावंत म्हटले जाते. कुणी निष्ठावंत म्हटले की, त्यालाही गोड वाटले जाते.

असे पक्षीय निष्ठावंत, अन्याय पचवताना दिसतात ! झेंडे-गोंडे मिरवीत मिरवीत, सतरंज्या उचलताना दिसतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7449 दैनिक झुंजार नेता 1नोव्हेंबर2020
----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

आमदार होणे आहे!


 आजची वात्रटिका

----------------------------

आमदार होणे आहे!

राजकारणाशी देणे घेणे नाही, समाजकारणाशी देणे घेणे आहे. आमची नियुक्ती होतेय का बघा? आम्हांलाही आमदार होणे आहे.

नियम,अटी आणि संकेतांना, तुम्ही हातोहात फसवू शकता. घुसवायचे ठरविले तर, तुम्ही कुणालाही घुसवू शकता.

निवडणूक जिंकूच शकत नाही, हे आमचे खरे रडगाणे आहे ! आमच्या प्रत्येकाचा हा आवाज, आम्हांला आमदार होणे आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5961 दैनिक पुण्यनगरी 1नोव्हेंबर2020 -----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...