Thursday, October 10, 2019

लिंबू-मिरच्या



आजची वात्रटिका
-------------------------------------
लिंबू-मिरच्या
राफेल विमानाच्या
चाकाखाली लिंबू.
जो विचारील प्रश्न,
तोच आता वेडबंबू.
लिंबू प्रकरणामुळे,
मिरच्या झोंबू नयेत !
पायाभूत समस्या
आभाळापर्यंत लांबू नयेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7090
दैनिक झुंजार नेता
11ऑक्टोबर2019
---------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

शरणार्थी

आजची वात्रटिका
-------------------------------------
शरणार्थी
वेसणीमागे वेसण,
विरोधकांच्या नाकी आहे.
निकाल आधीच लागलेला,
फक्त लढाई बाकी आहे.
कुणी केली वळवळ,
कुणी माफीनाम्यावरती आले !
ज्यांनी ज्यांनी केले तह,
ते ते सगळे शरणार्थी झाले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5592
दैनिक पुण्यनगरी
10ऑक्टोबर2019

Wednesday, October 9, 2019

पंचनामा



आजची वात्रटिका
-------------------------------------
पंचनामा
जे जे येतील ते,
पक्षात घेतले गेले.
जेवढे धुता येतील,
तेवढे धुतले गेले.
मित्र शत्रू झाले,
शत्रू मित्र झाले आहेत.
जे पदरी पडले,
ते पवित्र झाले आहेत.
त्यांची आणि यांची
सारखीच तऱ्हा आहे !
पक्षांतराचा पंचनामा,
झाला तो पुरा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5591
दैनिक पुण्यनगरी
9ऑक्टोबर2019
--------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

सीमोल्लंघन

आजची वात्रटिका
-------------------------------------

सीमोल्लंघन

जिथे नाचता येत नाही,
तिथले वाकडे अंगण असते.
आजचे पक्षांतर म्हणजे,
पक्षीय सीमोल्लंघन असते.

पक्षीय सीमोल्लंघनाची
कसलीच तमा नाही!
पक्षीय सीमोल्लंघनाला
कसलीही सीमा नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5590
दैनिक पुण्यनगरी
8ऑक्टोबर2019

Tuesday, October 8, 2019

रावणाचे 'ज्वलंत' मनोगत


घुसखोर



आजची वात्रटिका
-------------------------------------
घुसखोर
जिकडे शिते तिकडे
भुते नाचयाला लागली.
एकमेकांचे पाढे,
जोरात वाचायला लागली.
फसवता आले पाहिजे,
नासवता आले पाहिजे !
रिकाम्या जागी,
घोडे घुसवता आले पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-70889
दैनिक झुंजार नेता
8ऑक्टोबर2019
---------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

सूर्यकांती,वात्रटिका


शुभ दसरा


Monday, October 7, 2019

राजकीय मसणवटा

आजची वात्रटिका
-------------------------------------
राजकीय मसणवटा
जीवनाचे अंतिम सत्य,
मसणवट्यातच कळले जाते.
तरीसुद्धा मसणवट्यातही,
नीच राजकारण खेळले जाते.
खोटे दिलासे, खोटे सांत्वन,
खोटी श्रद्धांजली वाहिली जाते.
पोळी कशी भाजता येईल?
एवढीच गोष्ट पाहिली जाते.
मसणवट्यात सुटावी,
एवढी कशाला खाज पाहिजे?
लुच्च्यांना आणि बगलबच्च्यांना,
थोडी तरी लाज पाहिजे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7087
दैनिक झुंजार नेता
6ऑक्टोबर2019
--------------------------------------

चवचालपणा



आजची वात्रटिका
-------------------------
चवचालपणा
जसे तोडाफोडीचे असते,
तसे तडजोडीचे असते.
जेवढे राजकारण कडू,
तेवढेच ते गोडीचे असते.
जशी ज्याची चाल,
तशी राजकारणाची चव असते !
राजकीय चवचालपणात,
सगळ्यांकडूच देव-घेव असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7088
दैनिक झुंजार नेता
7ऑक्टोबर2019

अवमूल्यन



आजची वात्रटिका
-------------------------------------
अवमूल्यन
जम्माडी जम्मत आहे,
गम्माडी गंमत आहेत.
निवडणूकीच्या मोसमात,
ज्याला त्याला किंमत आहे.
ज्याला जे बकता येईल,
ते बिनधास्त बकले जाते !
अमूल्य असे मतदान,
अगदी बेभाव विकले जाते !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5589
दैनिक पुण्यनगरी
7ऑक्टोबर2019
--------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

Sunday, October 6, 2019

बंडखोरीचे परिणाम

आजची वात्रटिका
-------------------------------------
बंडखोरीचे परिणाम
काही बंडखोर दामटले आहेत,
काही बंडखोर चेमटले आहेत.
बंडखोरीचे परिणाम,
जसे बंडखोर तसे उमटले आहेत.
कुणाची बंडखोरी,
कंडखोरी ठरली जात आहे !
ऐनवेळी शेपूट घातलेल्यांची
बंडखोरी षंढखोरी ठरली जात आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5588
दैनिक पुण्यनगरी
6ऑक्टोबर2019

Saturday, October 5, 2019

सत्कार सोहळे





































अंतिम सत्य

आजची वात्रटिका
-------------------------------------
अंतिम सत्य
तुम्ही नाट्याधीश पाहिजेत,
तुम्ही खोट्टयाधीश पाहिजेत.
तुम्ही पोट्टयाधीश पाहिजेत,
तुम्ही कोट्याधीश पाहिजेत.
निष्ठा,तत्व,लोककल्याण,
हे सारे सारे मिथ्य आहे !
लोकशाही निवडणुकांचे
पैसा हेच अंतिम सत्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5588
दैनिक पुण्यनगरी
5ऑक्टोबर2019
--------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

Friday, October 4, 2019

स्त्रीशक्ती दर्शन



आजची वात्रटिका
-------------------------------------
स्त्रीशक्ती दर्शन
राजकारणात स्त्रीशक्ती,
शक्ती म्हणून नाही;
युक्ती म्हणून वापरली जाते.
आरक्षणाच्या नावाखाली
ती बाहुली म्हणून ढोपरली जाते.
राजकीय स्वार्थापोटी,
स्त्रीशक्तीची उपासना असते !
पोटात एक,ओठात एक,
अशी स्त्रीशक्तीची जोपासना असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5587
दैनिक पुण्यनगरी
4ऑक्टोबर2019
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...