Wednesday, January 4, 2023

भाषणबाजी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

भाषणबाजी

बोलता आले म्हणजे,
पेलता येतेच असे नाही.
कोलता आले म्हणजे,
तोलता येतेच असे नाही.

कुणासाठी भाषणबाजी,
टाळ्या आणि हश्या आहे,
कुणासाठी भाषणबाजी,
छंद नाहीतर पेशा आहे.

बोलण्यात ओलावा असावा,
उगीच आपले कोरडे नकोत!
बोला,चाला आणि पेला,
उगीच आपले ओरडे नकोत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8139
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4जानेवारी2023
 

प्रतिमा निर्मिती....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

प्रतिमा निर्मिती

ऐतिहासिक प्रतिमा,
उलट्या सुलट्या करू लागले.
कुणी लागले डरंगळायला,
कुणी उलट्या करू लागले.

ऐतिहासिक प्रतिमांना,
आपल्या सोयीचे अर्थ आहेत.
प्रतिमा निर्मितीही तशीच,
जसे आपले आपले स्वार्थ आहेत.

याचा अर्थ मात्र असा नाही,
सर्वच्या सर्व प्रतिमा खऱ्या आहेत!
तरीही आपलीच पंचायत नको,
जरी आपल्याच मोऱ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6681
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
4जानेवारी2023
 

Tuesday, January 3, 2023

खुर्चीवीरांचे प्रताप...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

खुर्चीवीरांचे प्रताप

आपल्या मनातली गरळ,
खुर्चीवीर ओकायला लागले.
ऐतिहासिक उपाध्यांनी,
इतिहास ठोकायला लागले.

श्रद्धा आणि सबुरी राखायला,
त्यांच्याकडे कुठे धीर आहे?
खुर्चीवीरांच्या तोंडामध्ये,
कसला कसला वीर आहे.

शाब्दिक जाळ्यामध्ये,
एकमेकांना गाठायला लागले!
एकजात सगळेच खुर्चीवीर,
वाटेल तसे सुटायला लागले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8138
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3जानेवारी2023
 

सावित्रीची आण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सावित्रीची आण

तुला मान आहे, पान आहे,
सगळे कसे छान छान आहे.
म्हणूनच गं आई..बाई..
तुला आई सावित्रीची आण आहे.

तुला वास्तवाचे भान आहे,
तुला वास्तवाची जाण आहे.
चुकून विसरली,चुकून घसरली,
तुला आई सावित्रीची आण आहे.

ओठात हवी,पोटात हवी,
याचे तुला आत्मभान आहे.
सावित्री रुजव,सावित्री जोजव,
तुला आई सावित्रीची आण आहे.

अबबलेची तू सबला झालीस,
शक्ती आणि मुक्तीचे वाण आहे.
सावित्रीचा वारसा आरसा हो,
तुला आई सावित्रीची आण आहे.

भूत वेगळे,भविष्य वेगळे,
हातात तुझ्या वर्तमान आहे !
सावित्री घडव, सावित्री मढव,
तुला आई सावित्रीची आण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6680
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
3जानेवारी2023
 

Monday, January 2, 2023

धोक्याचा इशारा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

धोक्याचा इशारा

बाळा,स्वागताला भुलू नकोस,
स्वागताची कारणे समजून घ्यावीस.
अनुभवाचे बोल सांगत,
2023 ला म्हणाले 2022.

पिण्याने होते स्वागत,
पिण्यानेच निरोप दिला जातो.
मागच्या वर्षातून पुढच्या वर्षी,
संकल्पांचा कागद नेला जातो.

येताना खुशीत आलास,
जाताना जीव कासावीस होईल!
बाळा हे कालचक्र आहे,
विचार करेपर्यंत 2024 येईल!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8137
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2जानेवारी2023
 

बंडखोरीचे विश्लेषण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

बंडखोरीचे विश्लेषण

कितीही रोखा तरी वळवळतो,
असा बंडाचा किडा असतो.
जैसी करणी वैसी भरणी,
असा बंडाचा विडा असतो.

हळूहळू मुरत मुरत जाते,
असे बंडाचे लोण आहे.
मग बंडवाले बघत नाहीत,
आपल्यासमोर कोण आहे?

बंडाची क्रांती झाली तर,
तेच खरे बंडखोरीचे चीज असतो!
मागच्या बंडखोरीमध्ये,
पुढच्या बंडखोरीचे बीज असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6679
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
2जानेवारी2023
---------------------------------------
मराठी वात्रटिका
 

Sunday, January 1, 2023

वर्षांतर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

वर्षांतर

पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय,
जुने जात नाही आणि नवे येत नाही.
बाटली आणि ताटलीशिवाय,
निरोप आणि स्वागतही होत नाही.

निरोप आला आणि स्वागताला,
ग्लास बाटल्यांचा खळखळाट असतो!
ज्यांना निमित्त हवे असते,
त्यांचा तर खरा फळफळाट असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8136
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1जानेवारी 2023
 

शनिवार ऐतवार .... मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका
-----------------------
शनिवार ऐतवार
उत्सवप्रेमी लोकांसोबत,
काळाची बघा केवढी गट्टी आहे?
निरोपाच्या हँगओव्हरला,
नववर्षाच्या आरंभीच सुट्टी आहे.
ज्यांना बहाणा हवा असतो त्यांना,
उत्सवांचा उत्साह तर फार असतो!
तुमच्या आमच्या मनात मात्र,
नेहमीच शनिवार ऐतवार असतो !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6678
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18वे
1जानेवारी 2023

Saturday, December 31, 2022

31 डिसेंबरची विनंती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

31 डिसेंबरची विनंती

माझे पाप कोणते सांगा,
माझ्यावरच सगळा लोड यावा.
सांगा कुणाला वाटत नाही?
शेवटचा दिवस गोड व्हावा.

लास्ट अँड बेस्ट असल्यासारखे,
ढोस ढोस ढोसली जाते.
जुने जाऊन नवे वर्ष आल्यावरच,
खरी किक बसली जाते.

नववर्षाच्या शुभेच्छा असतात,
पियो और पिने दो!
मला निरोप द्यायचा तर द्या,
पण एक जानेवारीला तरी आने दो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8136
दैनिक झुंजार नेता
31डिसेंबर2022
 

Friday, December 30, 2022

वर्षांतर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

वर्षांतर

पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय,
जुने जात नाही आणि नवे येत नाही.
बाटली आणि ताटलीशिवाय,
निरोप आणि स्वागतही होत नाही.

निरोप आला आणि स्वागताला,
ग्लास बाटल्यांचा खळखळाट असतो!
ज्यांना निमित्त हवे असते,
त्यांचा तर खरा फळफळाट असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8135
दैनिक झुंजार नेता
30डिसेंबर2022
 

टाईमपास.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

टाईमपास

जो पटकन फोडला जातो,
तो जनतेच्या अपेक्षांचा फुगा आहे.
अधिवेशन कोणतेही असो,
जणू त्यांच्या टाईमपासची जागा आहे.

लोक उघड्या डोळ्यांनी बघतात,
अधिवेशनात काय काय केले जाते!
पावसाळी असो हिवाळी,
अधिवेशन तर एन्जॉय केले जाते.

सभागृहाच्या आत आणि बाहेर,
आपले कलागुण उधळले जातात!
खरे आणि गरमागरम मुद्दे,
गदारोळामध्ये साधळले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6675
दैनिक पुण्यनगरी
28डिसेंबर2022


 

भक्तांतर आणि रक्तांतर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

भक्तांतर आणि रक्तांतर

पक्षांतर हा शब्द काही,
राजकारणात नवा नाही.
पक्षांतर करूच नये,
असा कुणाचाच दावा नाही.

पक्षांतराच्या पाठोपाठ,
आता भक्तांतर होते आहे.
अंतराने अंतर वाढत गेले,
आता रक्तांतर होते आहे.

चडफड आणि फडफडीशिवाय,
राजकीय पक्षांतर होत नाही!
भक्तांतर होवो वा रक्तांतर,
राजकीय लक्ष्यांतर होत नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6677
दैनिक पुण्यनगरी
30डिसेंबर2022
 

Thursday, December 29, 2022

मुद्द्याची गोष्ट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

मुद्द्याची गोष्ट

कुणाचा गुद्ध्यावरून मुद्दा आहे
कुणाचा मुद्द्यावरून गुद्दा आहे.
सगळेच विसरून जातात,
नेमका आपला काय हुद्दा आहे?

गुद्द्यावरती येता येता,
मुद्दा आणि हुद्दा विसरू नका !
लोकशाहीची बेअब्रू होईल,
एवढे तरी कुणीच घसरू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6676
दैनिक पुण्यनगरी
29डिसेंबर2022



 

बिनडोक.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बिनडोक

जेंव्हा डोके असणारे लोकही,
बिनडोकपणे वागू लागतात.
तेंव्हा बिनडोक लोकही,
मोठ्या आश्चर्याने बघू लागतात.

बिनडोक लोकांनाही वाटते,
बिनडोकपणा काही शाप नाही!
आपण बिनडोक आहोत,
याच्यात काही पाप नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8133
दैनिक झुंजार नेता
28डिसेंबर2022

 

Tuesday, December 27, 2022

अल्पमत बहाद्दर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

अल्पमत बहाद्दर

उठसूठ मतदारांची फसवणूक,
हेच लोकशाहीचे सार झाले.
निवडून दिले कुणाला?
बघा कुणाच्या हाती कारभार आले?

बहुमतातील बाजूला करून,
अल्पमतातील सत्तेचे मालक आहेत!
ज्यांनी बाजूला बसायला पाहिजेत,
तेच आज सत्तेचे चालक आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8132
दैनिक झुंजार नेता
27डिसेंबर2022
 

आनंदी आनंद गडे... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

आनंदी आनंद गडे

खाताडाबरोबर पेताडही,
नववर्षाच्या स्वागताला सज्ज आहे.
पेताड म्हणाला खाताडाला,
आता तर इथे आपलेच राज्य आहे.

पेताडाने खाताडाला दिलेला,
इशारा एकदमच सूचक आहे !
त्यांच्या आनंदाचे कारण,
जेवढे उघड तेवढेच खोचक आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6674
दैनिक पुण्यनगरी
27डिसेंबर2022
 

Monday, December 26, 2022

टेस्टर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

टेस्टर

शेतकऱ्यांपेक्षा नट-नट्यांसाठी,
मीडियाला जास्त पाझर फुटतात.
त्यांना नट- नट्यांच्या आत्महत्या,
जास्तीत जास्त महत्त्वाच्या वाटतात.

आत्महत्या कुणाच्याही असोत,
सगळ्याच चिंताजनक गोष्टी आहेत!
नट नट्यांच्या आत्महत्या मात्र,
चघळायला जास्तच टेस्टी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6673
दैनिक पुण्यनगरी
26डिसेंबर2022
 

सूडाग्नी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
सूडाग्नी
सूडाग्नीने सूडाग्नी,
धडाधड पेटायला लागले.
सगळेच एकापेक्षा एक,
सूडासूर वाटायला लागले.
शब्दा शब्दात आग आहे,
डोळ्या डोळ्यात आग आहे!
आपल्या राजकीय इतिहासाचा,
वर्तमानाला प्रचंड राग आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8131
दैनिक झुंजार नेता
26डिसेंबर2022

 

Sunday, December 25, 2022

वसुलीचा व्यवहार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------


वसुलीचा व्यवहार

ग्रामपंचायत चा हिशोब
जुळता जुळत नाही.
आपले मतदान गेले कुठे?
कुणालाच कळत नाही

कुणी हिशोबाला कच्चे,
कुणी हिशोबाला चोख आहे!
जिथे वाटली गद्दारी,
तिथे वसुली रोखठोक आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8129
दैनिक झुंजार नेता
24डिसेंबर2022
 

राजकीय तडजोड.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

राजकीय तडजोड

कधी उलट बोलले जात असते
कधी सुलट बोलले जात असते.
राजकीय तडजोडीतूनच
राजकारण फुलले जात असते.

सकारात्मक नकारात्मक,
तडजोरीत दोन्हीही पक्ष आहेत!
एकमेकांच्या राजकीय प्रगतीला,
सगळेच्या सगळे साक्ष आहेत!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8130
दैनिक झुंजार नेता
25डिसेंबर2022

 

निर्लज्ज .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------


निर्लज्ज 

निर्लज्ज हा शब्द वापरणे,
खूप धोक्याचे ठरू शकते.
शब्दाला असंसदीय ठरवून,
तुमचे निलंबनही करू शकते.

निर्लज्ज या शब्दांमध्ये,
तशी वेगवेगळी छटा आहे !
निर्लज्जपणे सांगावे लागते,
त्यात खरा सूडाचा वाटा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6671
दैनिक पुण्यनगरी
24डिसेंबर2022

 

अधिवेशननामा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

अधिवेशननामा

लोकशाही अधिकारांना,
लोकशाहीर आयुधांनी मारले जाते.
सभात्याग आणि निलंबनाने,
अधिवेशन वादळी ठरले जाते.

वादळी अधिवेशनामध्ये,
राजकीय वचपे काढले जातात!
आहे ते उरकते घेवून,
अधिवेशनं पार पाडले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6672
दैनिक पुण्यनगरी
25डिसेंबर2022
 

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...