Friday, May 22, 2009

प्रचाराची जातकुळी

***** आजची वात्रटिका ****
*********************

प्रचाराची जातकुळी

कुठे तुतारी वाजवली होती
कुठे टाळी वाजवली होती.
जातीयवादी प्रचाराने
अंदाधुंदी माजवली होती.

जातीसाठी माती खात
जातीने जातीला जागले होते.
स्वत:ला पुरोगामी समजणारेही
जातीने प्रचाराला लागले होते.

आम्हीच कशाला सांगावे ?
सर्वांनाच सगळे द्न्यात आहे !
जय आणि पराजयातही
खरा जातीचाच हात आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...