Friday, May 22, 2009

जातीसूत्र

जातीसूत्र

जात जन्माला येत नाही
जात जन्मानंतर रूजवली जाते.
जात जातीय खुणांनी
छान सजवली-धजवली जाते.

जात गेल्यासारखी वाटते.
पण जात काही जात नाही.
जात म्हणजे असाध्य रोग
उपाय काही द्न्यात नाही.

जात जाईल कशी ?
जात जातीने पाळली जाते.
जात जातीला भेटताच
जात जातीवर भाळली जाते.

जातीच्या मूळाशी
जाती-जातीचे गोत्र असते !
’ रूजवा आणि माजवा ’
हे जाती-जातीचे सूत्र असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...