Friday, May 15, 2009

ऑर्कुट चे वास्तव

******* आजची वात्रटिका *******
**************************

ऑर्कुट चे वास्तव

चेहर्यावर अनेक चेहरे
लावतात लोक येथे.
गर्ल्स फ्रेण्ड्च्याच मागे
धावतात लोक येथे.

कौपी-पेस्ट्चाच मंत्र
इथे जपवला जातो.
कुठे न खपलेला माल
इथे खपवला जातो.

मैत्रीची नातीही इथे
तकलादू-बेगडी असतात.
आपल्या घराचे दरवाजे
कुठे सर्वांसाठी उघडी असतात ?

नकली नावे,नकली चेहरे
जो तो इथे मिरवतो आहे !
वास्तवाच्या आभासामध्ये
खरा चेहराही हरवतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Lokesh Patade said...

पटल मनापासून पटल

दैनिक वात्रटिका l 2 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 303वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 2 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 303वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1TmT4KjN1PCO9HUFqTCR...