Tuesday, April 26, 2011

सत्य दर्शन

हा त्याचा भाई आहे,
तो याचा भाई आहे.
प्रत्येक ठिकाणी एक एक
ज्युनियर सत्य साई आहे.

चमत्कार मोठे आहेत,
चमत्कार खोटे आहेत.
पायावर लोटांगण घालणारेच
नर्मदेचे गोटे आहेत.

खोटॆही खरे वाटते
हाच मोठा चमत्कार आहे !
खरे बोलले कुणी तर म्हणती,
हा विषारी फुत्कार आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------   गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी  गांधीगिरी करताना, अण्णा कधी दमले नाहीत.  गांधीगिरी आणि ...