Thursday, April 7, 2011

दुसरी लढाई

देणारे आपले आहेत,
घेणारेही आपले आहेत.
स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईत
काळ्यात गोरे लपले आहेत.

पहिल्या आणि दुसर्‍या लढाईत
फार काही अंतर नाही !
लोकसहभागाशिवाय यश
हे काही जंतरमंतर नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...