Saturday, April 30, 2011

दैनिक फोडाफोडी

राजकीय पक्ष फोडावा तसा
पेपरवालेही पत्रकार फोडतात.
रस्सीखेच वाढली की,
किंमत देऊन पत्रकार ओढतात.

ओढाओढी आणि फोडाफोडीची
पत्रकारीतेलाही बाधा आहे !
सबसे बडा रूपय्या
व्यवहार एकदम साधा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------   गांधीगिरी आणि ब्लॉगगिरी  गांधीगिरी करताना, अण्णा कधी दमले नाहीत.  गांधीगिरी आणि ...