Sunday, May 15, 2011

’घर-घर’ की कहानी

पैसा झाला मोठा,
माणूस खोटा होतो आहे.
’हम दो हमारे दो’ मुळे
सांस्कृतिक तोटा होतो आहे.

ज्याची त्याची गरज
पैशावरती भागली आहे.
घर नावाच्या संस्कृतीला
घर-घर लागली आहे.

प्रायव्हसी जपतानाच
कौटुंबिक जाणीव ठेवावी लागेल !
नसता घरा-घरावरती
’रेस्ट हाऊस’ची पाटी लावावी लागेल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -321 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1L7d09rSTvZKajObapVCl...